हम सब एक है
बीड : लोकसभा निवडणुकीत खा.बजरंग सोनवणे यांचा विजय झाला. तर पंकजा गोपीनाथ मुंडे यांचा निसटता पराभव झाला.यानंतर दोन समाजात जातीय तणाव निर्माण झाला. पोलीस प्रशासनाकडून अनेकांवर कारवाई करण्यात आली. मात्र सोशल मिडीयावर पंकजा मुंडे, बजरंग सोनवणे यांच्या संदर्भात टीका टिप्पणी, अश्लील व्हिडीओ,ऑडीओ वायरल होत आहेत. या अनुषंगाने पोलीस प्रशासनाकडून आज जातीय सलोखा राखण्यात यावा या अनुषंगाने सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन जातीय सलोखा रॅली काढण्यात आली.
निवडणूक कोणतीही असो हार जित चालत असते. मात्र यावरून कोणत्याही समाजात तेढ निर्माण होऊ नये यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने आपली जबाबदारी अळखून काय टिका टिप्पणी करायची या संदर्भात विचार करणे गरजेचे असते. बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांचा पराभव आणि बजरंग सोनवणे यांचा विजय या संदर्भात दोन समाजात प्रचंड तणावग्रस्त वातावरण जिल्ह्यात दिसून येत आहे. या अनुषंगाने या वातावरणावर नियंत्रण आणि दोन्ही समाजात सलोख्याचे वातावरण निर्माण व्हावे या अनुषंगाने पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरामध्ये सर्व जाती धर्माचे पदाधिकार्यासह शाळा, महाविद्यालयामधील विद्यार्थी, विद्यार्थीनींनी यात सहभाग नोंदवला. पोलीस प्रशासनाकडून छोट छोटे बॅनरवर‘नको भांडू, नको भांडू हे वर्दिला ओळखलं, तुम्हास येथेच रहायचं तुम्हास का नाही उमेजले’,’ जाती जातीचे भांडण पोलीसास नडले, जाती जातील अढी,करू नका हे नडेल, पुढची पिढी.‘जर भांडशील एकमेकांशी तर राहशील नोकरी पासून उपाशी’, पिढी पिढी परंपरा प्रेमाची, आता भांडला तर शपथ तुला रामाची’, जातीवाद जो करेल तो पोलिसांची काठी खाईल.’ लिहिलेले विद्यार्थ्यांच्या हातात दिसून आले. या रॅलीमध्ये पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, पोलीस अधिकारी,कर्मचारी, व्यापारी वर्ग, विद्यार्थी, विद्यार्थींनी,सर्वसामान्य व इतर सर्व लोक यामध्ये सहभागी झाले होते. दरम्यान, या जातीय सलोखा रॅलीतून हम सब एक है असा संदेश पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला.

0 Comments