Header Ads Widget

Responsive Advertisement

परळीत गोळीबार;एक ठार!

परळी : शहरामध्ये संंध्याकाळी नऊच्या सुमारास दोन गटात गोळीबार झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून दोनजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. गोळीबार करण्याचे कारण अस्पष्ट असून पोलिस याबाबत जवाब घेत आहेत.

परळी शहरामध्ये आज रात्री नऊ च्या सुमारास गोळीबार झाला. यामध्ये एक ठार व दोन जखमी झाल्याचे समोर येत असून बबन गीतेचे कट्टर समर्थक माधव गीते यांनी बप्पा आंधळे यांच्यावर गोळीबार केल्याने ते ठार झाले असून अन्य दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. गोळीबार करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या गोळीबारामुळे परळीत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.



या गोळीबारात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट धनंजय मुंडे समर्थक मरळवाडीचे विद्यमान सरपंच बापूराव आंधळे यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे, तर नंदागौळ येथील ग्यानबा मारोती गित्ते जखमी झाले आहेत. दरम्यान, हा गोळीबार नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला आणि कुणी केला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

बबन गीते यांचा सहकारी महादेव गीतेही जखमी

या गोळीबारात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते बबन गीते यांचा सहकारी महादेव गीते यांनाही गोळी लागली त्यांच्यावर अंबाजोगाई च्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या गोळीबार प्रकरणांमध्ये एक ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

Post a Comment

0 Comments