Header Ads Widget

Responsive Advertisement

जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंना जामखेडमधून केले अटक !



बीड :  लोकसभा निवडणुका झाल्या. निकालही लागला आणि सुरू झालं ओबीसी-मराठा वादावादी. आणि आता पुढे येऊ लागली आहे एक एक क्लिप वायरल होऊ लागली आहे. यामध्ये आता शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेची ऑडिओ क्लिप वायरल झाली होती. आज शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बीड नगर रस्त्यावर जामखेड येथून अटक केली.

 कुंडलिक खांडे यांची एक व्हाईस क्लिप दोन दिवसापूर्वी व्हायरल झाल्यानंतर परळी आणि पेठ बीड पोलिसात वेगवेगळे गुन्हे दाखल झाले होते. तसेच खांडे याच्यावर काही महिन्यापूर्वी ३०७ चा गुन्हा दाखल झाला होता.

 लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना धोका देत खांडे याने बजरंग सोनवणे यांचं काम केले होते. याबाबत खांडे यांची एक व्हाईस क्लिप व्हायरल झाली होती. ज्यामध्ये खांडे ने या गोष्टीची कबुली देतानाच कृषिमंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला करून त्यांची गाडी फोडण्याबाबत वक्तव्य केले होते.

 या क्लिप वरून वाल्मिक कराड यांच्या तक्रारीवरून खांडे विरुद्ध परळी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. त्याचा शोध घेण्यासाठी एलसीबी आणि संभाजीनगर पोलिसांची पथक रवाना झाली होती.

 दरम्यान जामखेड येथे खांडे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी  शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांना अटक केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments