Header Ads Widget

Responsive Advertisement

कुंडलिक खांडेला तीन दिवसाची पोलीस कोठडी


कुंडलिक खांडेला तीन दिवसाची पोलीस कोठडी
बीड : लोकसभा निवडणुका झाल्या. निकालही लागला आणि सुरू झालं ओबीसी-मराठा वादावादी. आणि आता पुढे येऊ लागली आहे एक एक क्लिप वायरल होऊ लागली आहे. यामध्ये आता शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेची ऑडिओ क्लिप वायरल झाली होती. आज शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बीड नगर रस्त्यावर जामखेड येथून अटक केली होती. आज दुपारी कोर्टासमोर हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
त्या ऑडिओक्लिप च्या प्रकरणात खांडे विरुद्ध दोन गुन्हे देखील दाखल झाले आहेत. मात्र ऑडिओक्लिप प्रकरनंतर पोलीस अचानक सक्रिय झाले असून तीन महिन्यापूर्वी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या ज्ञानेश्‍वर खांडेंवरील प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी पहाटे जामखेड येथून कुंडलिक खांडेच्या मुसक्या बांधल्या. त्याला सकाळी बीड ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलिसांनी शनिवारी दुपारी खांडेला बीडच्या न्यायालयात हजर केले. तसेच तपासासाठी सात दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी केली.आरोपीचे वकील बी डी कोल्हे यांनी सदर अटकच अवैध असल्याचा जोरदार दावा न्यायालयासमोर केला. मात्र प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी दुसरे न्या. एस. टी. सहारे यांच्या न्यायालयाने खांडेला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यामुळे आता कुंडलिक खांडेच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. 

Post a Comment

0 Comments