गेवराई : अवैध वाळु वाहतुक रोखण्यासाठी गस्त करत अससेले तहसिलदार संदिप खोमने यांच्या शासकीय गाडीचे काचा फोडून वाळु तस्कर गुंडानी त्यांच्या पथकातील अधिका-या वर जिव घेणा हल्ला करत मारहाण केल्या प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात तहसीलदार संदिप खोमने यांच्या फिर्यादी नूसार जिवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, थेट पथक व तहसीलदाराच्या गाडीवर दगडफेक करण्याची हिंमत का झाली ? या विषयी उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे.
दिनांक २५ मंगळवार रोजी रात्री १० वाजता तहसिलदार खोमने व वाळु चोरी प्रतिबंधक पथकातील कर्मचारी जितेंद्र लेंडाळ मंडळ अधिकारी गेवराई, परमेश्वर काळे मंडळ अधिकारी चकलांबा, सचिन खेत्रे तलाठी गोळेगाव, अजिम शेख तलाठी जातेगाव, तलाठी माणिक पांढरे सज्जा गेवराई शासकीय वाहन चालक शकील गाजी असे रात्री गोदावरी नदी पात्रातुन होणा-या वाळु चोरी प्रतिबंध करण्यासाठी सरकारी वाहन बोलेरो क्रमांक एम.एच.२३-बीएच- ०२५७ या वाहनाने गस्त करीत असताना मौजे तलवाडा, काठोडा, जातेगाव, गढी येथुन गस्त करुन रात्री ११.५० वाजण्याच्या सुमारास गेवराई बायपास येथे आलो असता एक चोरीचे वाळुने भरलेले विना नंबरचा हायवा अतिशय भरधाव १००ते १२० कि.मी. प्रति तास वेगाने राक्षसभुवन येथील चोरीची वाळु असल्याची खात्री पथकाला आल्याने सदर वाहनाचा पाठलाग सुरु केला. त्यावेळी बीडच्या दिशेने हायवा वेगाने जात असताना दिसुन आला काही कि.मी. पुढे गेल्यानंतर स्वीफ्ट डिझायर क्रमांक एमएच.-४३-०-८२८१ हे वाहन त्यावरती शिव सेना असे लिहलेले व वाघाचा लोगो असलेला या वाहनातुन जावेद पठाण नामक इसम पथक वापरत असलेल्या शासकीय वाहना लगत त्याचे वाहन चालवु लागला व गाडी अनिल दादा की है छोड्दो असे म्हणु लागला. सदरचा विना नंबरचा हायवाचे पाठलाग करुन थांबवत असताना जावेद नावाच्या इसमाने महसूल पथकाच्या वाहनास त्याचे वाहन आडवे चालवुन वाहन बेकायदेशीरपणे अडवण्याचा व सदरचा हायवा वाळुसह पळवुन जाण्यास मदत केली.व सदरचा हायवा पाडळशिंगी टोलनाका येथे थांबवण्याचा प्रयत्न केला असता पाडळशिंगी टोलनाक्याच्या बॅरिकेटस तोडुन सदरचा वाळु भरलेला हायवा व जावेदच्या ताब्यातील वाहन बीडच्या दिशेने पळुन गेले. त्यानंतर म्हाळसपिंपळगाव येथे अवैध वाळु साठा जप्त करुन गेवराईकडे हायवेवरुन येत असताना पांढरवाडी रस्त्यावरील हायवे ब्रीज जवळ बायपास रोड गेवराई येथे एक काळ्या रंगाची स्कार्पिओ शासकीय वाहनास आडवी लावुन वाहन थांबवण्यात आले असता सदर वाहनातुन ०७ ते ०८ इसम व जावेद नावाचे व्यक्ती सोबत खाली उतरुन त्यांच्या हातामध्ये लाकडी व लोखंडी दांडे होते. सदर दांड्याने त्यांनी तहसिलदार खोमने यांच्या सह पथकावर प्राणघातक हल्ला केला व सर्वांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी केलेल्या हल्यात माझ्या वाहनाचे डाव्या बाजुचा आरसा व समोरील संपुर्ण काचेचे नुकसान होऊन सोबतच्या कर्मचा-यांना मुक्कामार व फुटलेल्या काचेचे तुकडे लागले तसेच त्यांनी पुन्हा धावत येऊन सदर हत्यारांनी आमच्यावर पुन्हा प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. असल्याने गेवराई शहरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी तहसिलदार संदिप खोमने यांच्या फिर्यादी नूसार जावेद शेख सह इतरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

0 Comments