Header Ads Widget

Responsive Advertisement

वैद्यनाथ कारखान्याचे भंगार चोरणारे चौघे पकडले



 परळी    वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या स्टोअरमधील सामान चोरुन घेवुन जात असताना सुरक्षा रक्षकांनी सापळा रचत चौघांना घेरले यापैकी दोघे पळुन जाण्यात यशस्वी झाले तर दोघांना पकडुन कारखान्याचे संचालक माऊली मुंडे यांना कल्पना दिल्यानंतर त्यांनी या चोरांना ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर चौघांविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना लि.पांगरी हा दोन वर्षांपासुन बंद असुन कारखान्याच्या मशिन व सामानाच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.बालाजी दत्तराव मुंडे मंगळवार दि.2 जुन रोजी सकाळी 9 वाजता कामावर गेले असता त्यांना पाळी जमादार भास्कर सिद्राम मुंडे यांनी फोन करत स्टोअरमधील सामान पडले असल्याचे सांगितले.हा प्रकार चोरीसाठी असल्याचे लक्षात येताच सुरक्षा गार्ड राम नागोराव पाचुंदे,रामचंद्र भिमाबुवा भारती,शिवाजी शंकर मुंडे यांना सोबत घेवुन सापळा रचत चोरावर नजर ठेवली असता एम.एच.44 एए 0768 या क्रमांकाच्या स्कुटीवर दोघे व झाडीतुन दोघे असे चार जण पिन बार,मोटरी व ईतर पार्ट चोरुन नेत असताना पाठलाग केला असता दोघे पळुन जाण्यात यशस्वी झाले.

स्कुटीवरील दोघांना पाठलाग करुन पकडले व कारखान्याचे संचालक माऊली मुंडे यांना कळवळुन त्या दोघांना पोलिसांच्या स्वाधीन केले याप्रकरणी साधु सुर्यकांत शिंदे वय-25 वर्षे,मुस्तफा अंबीर मुनीयार वय-26 वर्षे,ईश्‍वर परमेश्‍वर हंगे तिघेही रा.कौठळी व  गोकुळ अशा चौघांविरुध्द परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments