Header Ads Widget

Responsive Advertisement

शेतकर्‍यांना कर्ज नाकारले...!

 


राज्य सरकारने राष्ट्रीयकृत बँकांना भरला दम

मुंंबई : सिबीलचे कारण सांगून काही बँकांना शेतकर्‍यांना कर्ज नाकारत आहेत. जर शेतकर्‍यांना कर्ज नाकारले त्याचे परिणामही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले जातील असा दमच उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीयकृत बँकांना भरला आहे.

कोणत्याही बँकांना शेतकर्‍याला कर्ज नाकारता येणार नसल्याचे फडणवीस म्हणाले. सीबीलचे कारण सांगून शेतकर्‍यांना कर्ज नाकारु नये असेही ते म्हणाले. तसे जर झाले तर ऋखठ दाखल करण्याचा इशारा फडणवीसांनी दिला आहे. याबाबतची माहिती सर्व बँकांना द्यावी असेही ते म्हणाले. दरम्यान, शेतकर्‍यांना कर्ज मिळताना येणार्‍या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला असल्याचेही फडणवीस म्हणाले. खरीप पूर्व बैठकीत बियाणे खतांची उपलब्धता याबाबतची चर्चा झाली आहे. शेतकर्‍यांना पिक विमा मिळाला पाहिजे, याबाबातचा आढावा आजच्या बैठकीत आम्ही घेतला. खरीपाच्या हंगामात शेतकर्‍यांना कोणताही त्रास होऊ नये याची काळजी घेतल्याचे फडणवीस म्हणाले.

दरम्यान, डीपीए खतांचा वापर कमी झाला पाहिजे आणि नॅनो खतांचा वापर वाढला पाहिजे यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. दरम्यान, जास्तीत जास्त शेतकर्‍यांना पिक विमा मिळाला पाहिजे असेही फडणवीस म्हणाले. तसेच रासायनिक खतांचे लिकिंग करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.  

 राज्यातील बहुतांश भागात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळं शेती कामांना वेग आला आहे. शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. या खरीपाच्या पेरणीत शेतकर्‍यांना  बी बियाणे खते यांचा अपेक्षीत प्रमाणात पुरवठा व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. दरम्यान, ज्या ठिकाणी चांगला झाला आहे, त्या ठिकाणी पेरणीच्या कामांना वेग आलाय. तर ज्या ठिकाणी चांगला पाऊस नाही, त्या ठिकाणचे शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, येत्या ३० जूनपर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

Post a Comment

0 Comments