Header Ads Widget

Responsive Advertisement

देवडीच्या तरूणाची पंकजा मुंडेविरूध्द आक्षेपार्ह पोस्ट



वडवणी : लोकसभा निवडणूक झाल्यानंतर आता आक्षेपार्ह पोस्ट वॉर सध्या सुरू झाले आहे. दोन समाजामध्ये समझोता करण्याऐवयजी तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न काही तरूण करत आहेत. त्यामुळे वातावरण पेटले जात आहे. अशाच प्रकारे वडवणी तालुक्यातील देवडी येथील एका तरुणाने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना उद्देशून सोशल माध्यमावर आक्षेपार्ह कमेंट केल्याप्रकरणी वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पुढील तपास वडवणी पोलीस करत आहेत.

वडवणीतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सतीश बडे यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ’एकच पर्व ओबीसी सर्व’, ’जय भगवान जय गोपीनाथ जय मल्हार’ अशी रील पोस्ट केली होती. संबंदित इन्स्टाग्राम रीलवर देवडी येथील धनंजय झाटे या तरुणाने दोन वर्गांमध्ये शत्रुत्व, दुर्भावना वाढवून एकोपा टिकू नये, या उद्देशाने पंकजा मुंडे  ांच्यावर आक्षेपार्ह कमेंट केली. दरम्यान सतीश बडे यांच्या फिर्यादीवरून धनंजय झाटे या तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणात आता पुढे आणखी काय कारवाई होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील तरुणाने सोशल मीडियावर पंकजा मुंडे यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केली होती. या पोस्टनंतर जिंतूरमध्ये तणाव निर्माण झाला होता. या प्रकारानंतर जिंतूर शहरातील बाजारपेठांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी संबंधित अल्पवयीन तरुणावर गु्न्हा दाखल केला होता. 

Post a Comment

0 Comments