बीड: शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेची ऑडिओ क्लिप वायरल झाली असून यामध्ये ते स्वत: आयुष्यात आपण पहिल्यांदा पंकजा मुंडेंना धोका दिला असून ३७६ बुथवरची सर्व यंत्रणा आपण बजरंग सोनवणे यांच्या दिमतीला लावली असल्याचेही क्लिपमध्ये आहे. त्याचबरोबर जो पैसा पंकजा मुंडे यांनी दिला तो पैसाही आपण बजरंग बप्पाच्या प्रचारासाठी वापरला असल्याचेही त्यामध्ये जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे अज्ञात व्यक्तीला बोलत असल्याचे दिसत आहे. महायुतीतल्या एका पक्षाच्या काही गुन्हयात अडकलेल्या एका पदाधिकार्याच्या कथीत ऑडीओ क्लीप सध्या व्हायरल होत आहेत. यात सदरचा पदाधिकारी ’आपण फक्त आपल्या गावात पंकजा मुंडेंना लीड दिली अशा प्रकारची ऑडीओ क्लिप दुपारी वायरल झाली होती. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास अज्ञात लोकांनी कुंडलिक खांडे यांच्या जालना रोडवरील कार्यालय अज्ञाताने तोडफोड केल्याची माहिती समोर येत आहे. कार्यालयावर हल्ला करून कार्यालयाची तोडफोड केली. यामध्ये कॅबिन सह आतमधील बरेच नुकसान झाले आहे.
दुसर्या ऑडीओ क्लीपमध्ये तो पदाधिकारी पक्षांतर करण्याची तयारी करताना देखील ऐकायला मिळत आहे.’ आपण आपल्या कार्यालयात लगेच शरद पवारांचा फोटो लाऊ, मी इथे नेहमी जनता दरबार भरवतो, मी थेट अंगावर जाऊ शकतो’ असे म्हटले होते. तसेच या ऑडीओ क्लीपमध्ये कथीत पदाधिकारी चक्क मंत्री धनंजय मुंडे यांची गाडी फोडण्याचा कट करित असल्याचे ऐकायला मिळत आहे. सदर ऑडीओ क्लीप मतदानाच्या अगोदरची असावी असा अंदाज असून धनंजय मुंडेंच्या गाडीवर दगड पडले तर आपले मतदान वाढेल असे भाष्य केले होते. यानंतर आज काही वेळापूर्वी मुंडे समर्थकांनी कुंडलिक खांडे यांचे जालना रोडवरील कार्यालयाची तोडफोड केल्याचे चित्र आहे. आता या घटनेमुळे बीड शहरातील वातावरण आणखी चिघळले आहे.


0 Comments