Header Ads Widget

Responsive Advertisement

वडवणीत फेसबुक वर आक्षेपार्ह कमेंट; तरुणावर गुन्हा दाखल



वडवणी : वडवणी येथील सुरेश मोरे यांच्या फेसबुक अकाऊंट वर केलेल्या पोस्टवर नितीन अर्जुन मुंडे रा कोठारबन ता वडवणी जि बीड यांने अश्लील कमेंट करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केले आहे तरी मराठा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे तसेच सुरेश भोरे यांनी वडवणी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून नितीन अर्जुन मुंडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 वडवणी येथील सुर्यकांत देवराव भोरे, वय. ३८ यांनी वडवणी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की  मी वरील ठिकाणाचा रहिवाशी असुन मजुरी करतो.माझे फेसबुकवर सुरेश दादा भोरे या नावाने अकांऊट असून ते मी चालवतो. दिनांक २६/०६/२०२४ रोजी दुपारी ३.३० वा. सुमारास मी माझे फेसबुक अकाऊंट सुरेश दादा भोरे यावर पोस्टस बघत असताना नितीन अर्जुन मुंडे रा कोठारबन ता वडवणी जि बीड याने फेसबुक अकाऊंट वरून फेसबुकवरील कर्मेन्ट केलेल्या वाचत असताना वरील अकाऊंट धारक याने अश्लील भाषेत कमेंट करून  दोन वेगवेगळ्या वर्गामध्ये शत्रुत्व, द्वेषभाव किंवा दुर्भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने प्रस्तुत केले असुन सदर फेसबुक अकाऊंट नितीन अर्जुन मुंडे या अकाऊंट धारकाचा शोध घेवुन त्याच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी आशा दिलेल्या फिर्यादीवरून वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तरी मराठा समाजातील तरूणांमध्ये या घटनेने संतापाची लाट निर्माण झाली असून अशा समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करणार्यावर कठोर कारवाई करण्यात यावी असे लेखी निवेदन मराठा समाजाच्या वतीने देण्यात आले व या घटनेचा जाहीर निषेध केला आहे.

Post a Comment

0 Comments