बीड : लोकसभा निवडणुका झाल्या. निकालही लागला आणि सुरू झालं ओबीसी-मराठा वादावादी. आणि आता पुढे येऊ लागली आहे एक एक क्लिप वायरल होऊ लागली आहे. यामध्ये आता शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेची ऑडिओ क्लिप वायरल झाली असून यामध्ये ते स्वत: आयुष्यात आपण पहिल्यांदा पंकजा मुंडेंना धोका दिला असून 376 बुथवरची सर्व यंत्रणा आपण बजरंग सोनवणे यांच्या दिमतीला लावली असल्याचेही क्लिपमध्ये आहे. त्याचबरोबर जो पैसा पंकजा मुंडे यांनी दिला तो पैसाही आपण बजरंग बप्पाच्या प्रचारासाठी वापरला असल्याचेही त्यामध्ये जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे अज्ञात व्यक्तीला बोलत असल्याचे दिसत आहे. महायुतीतल्या एका पक्षाच्या काही गुन्हयात अडकलेल्या एका पदाधिकाऱ्याच्या कथीत ऑडीओ क्लीप सध्या व्हायरल होत आहेत. यात सदरचा पदाधिकारी 'आपण फक्त आपल्या गावात पंकजा मुंडेंना लीड दिली, विधानसभेला ओबीसी मते मिळविण्यासाठी मला ते आवश्यक होते, पण आपण बप्पाचेच काम केले आहे. सगळी यंत्रणा त्यांना दिली आणि पैसेही पुरवले' असे सांगताना ऐकायला मिळत आहे. विशेष म्हणजे यात सदरचा पदाधिकारी आपण विश्वासघात केल्याचे कबुल करत आहे. तर दुसऱ्या ऑडीओ क्लीपमध्ये तो पदाधिकारी पक्षांतर करण्याची तयारी करताना देखील ऐकायला मिळत आहे. ' आपण आपल्या कार्यालयात लगेच शरद पवारांचा फोटो लाऊ, मी इथे नेहमी जनता दरबार भरवतो, मी थेट अंगावर जाऊ शकतो' असे दावे सदर पदाधिकारी करित असल्याचे ऐकायला मिळत आहे
.

0 Comments