Header Ads Widget

Responsive Advertisement

नवगण कॉलेज चौकात कारने दुचाकीस्वारास उडवले



बीड : शहरातील नवगण कॉलेज रोडकडे जाणार्‍या शिवराज चौकात आज सकाळी सातच्या सुमारास एका दुचाकीस्वारास क्र.एम.एच.१४-एच.यू.०६२९ या चारचाकी भरधाव कारने धडक दिल्याने दुचाकी थेट रस्त्यावरील डिव्हायडर वर जाऊन आदळली. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्या जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

शहरातील नवगण कॉलेज रस्ता रहदारीचा  असतो. कारण या परिसरात शाळा, महाविद्यालय असल्यामुळे विद्यार्थ्यांची ये जा चालू असते. दरम्यान गुरूवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास आलेल्या भरधाव कार  क्र.एम.एच.१४-एच.यू.०६२९ ने  मोटारसायकलस्वारास धडक दिली. या धडकेत मोटारसायकलस्वार गाडीसह डिवायडरवर जाऊन आदळला. अपघाताची घटना घडताच आपपासच्या लोकांनी तात्काळ मोटारसायकलस्वारास उचलून सरकारी रूग्णालयात दाखल केले आहे. जवळच शिवाजीनगर पोलीस ठाणे आहे. त्याचबरोबर पोलीस अधिक्षकांचे निवासस्थान देखील जवळच आहे. मात्र या चौकात एकाही पोलीस कर्मचार्‍याची नियुक्ती केलेली नाही. या रस्त्यावर अपघात होण्याची दाट शक्यता असते. त्याचबरोबर रहदारीचा रस्ता असल्यामुळे ट्राफीक पण वाढते त्यामुळे या ठिकाणी एका पोलीस कर्मचार्‍याची नियुक्ती करण्याची मागणी केली जात आहे.

Post a Comment

0 Comments