बीड : शहरातील भाजी मंडई परिसरातील बीएसएनएल टॉवरजवळ शुक्रवारी सकाळच्या सुमारास मृत अवस्थेतील अर्भक आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
येथील बशीरगंज, भाजी मंडईत बीएसएनएल टॉवरजवळ शुक्रवारी (दि.28) रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास मृत अवस्थेतेतील अर्भक आढळून आले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली. माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे आशपाक सय्यद, मनोज परजने व इतर कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेत मृत अर्भक जिल्हा रुग्णालयात दाखल केले.अनैतिक संबंधातून हा प्रकार घडला असल्याची चर्चा घटनेनंतर झाली.दरम्यान अर्भक फेकून देणार्यांचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. त्यानंतर याबाबतची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली होती. हे अर्भक कोणाचे आहे? त्याला कोणी त्या भागात आणून टाकले? याचा शोध घेण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरु केली आहे. बीड शहरात मात्र या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.पोलिस अधिक तपास करत आहेत.

0 Comments