बीड : लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली असून पोलीस प्रशासनातील खांदेपालट देखील सुरू झाली आहे. यामध्ये चार पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या असून चार पोलिस निरीक्षक बीडमध्ये येत आहेत.बीड जिल्ह्यातून चार पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत. विलास हिरामण पाटील,संतोष एकनाथ खेतमाळस यांची विनंतीवरून तर कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे हरिभाऊ नारायण खाडे,सुरेश सुधाकर चाटे यांची बदली करण्यात आली आहे.
जिल्ह्यातून पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्यानंतर विनंती आणि कार्यकाळ पूर्ण झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक,पोलीस उपनिरीक्षकांच्याही बदल्या झाल्या आहेत.सहाय्यक पोलीस निरीक्षकांमध्ये राहुल एकनाथ आघाव,बाळासाहेब गंगाराम आघाव,अविनाश अशोक राठोड,संतोष गुलाब मिसळे,धरणीधर बाब कोळेकर,नीता खंडूजी गायकवाड,घनशाम लालेश्वर अंतरप,भास्कर देवराव नवले,आनंद शिवाजी कांगुणे,राजधर मुरलीधर पठाडे,अनघा अंकुश गोडगे यांचा बदलीत समावेश आहे.तर बीड जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगरवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम धर्मराज सिरसाट,पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लक्ष्मण भोजगुडे तर धाराशिववरुन तुकाराम रघूनाथ बोडखे बीडला येत आहेत.दरम्यान पोलीस उपनिरीक्षकांमध्ये मीना भिवसन तुपे यांना एक वर्ष मुदतवाढ मिळाली आहे.
बीड जिल्ह्यात लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर कालावधी पूर्ण झालेले अधिकारी आणि काही विनंती बदल्यावरून पोलीस दलात बदल्यांचे सत्र सुरु झालेले आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक,पोलीस उपनिरीक्षक,पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या सुरु असून रविवारी राज्यातील ३७९ अधिकार्यांच्या बदल्या झाल्या आहेत.यात बीड जिल्ह्यातून विलास हिरामण पाटील,संतोष एकनाथ खेतमाळस,हरिभाऊ नारायण खाडे,सुरेश सुधाकर चाटे यांची बदली झाली आहे.तर राजेंद्र हरिभाऊ बहिरट सोलापूर शहरवरून तर सोमनाथ मधुकर जाधव यवतमाळवरून बीडला येत आहेत.

0 Comments