Header Ads Widget

Responsive Advertisement

सावतामाळी चौकात मनसेचे सरण रचो आंदोलन



बीड : बीड शहरातील खड्डड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नगर पालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मनसेचे शहर अध्यक्ष करण लोंढे यांनी केला आहे. त्यामुळे त्यांचे लक्ष वेधण्यासाठी मनसेच्या वतीने बुधवार दि.26 रोजी सरण रचो आंदोलन करण्यात आहे. 

शहरातील संत सावतामाळी चौक,जिजामाता चौक, अमरधाम स्मशानभूमी ते जुना मोंढा जोडणार्‍या या रस्त्यावर कित्येक वर्षापासून खड्डे पडले पुलावरील गज देखील उघडे असून अपघात होवून गंभीर दुखापत होण्याची शक्यता आहे.यापूर्वीही आंदोलन झाली होती परंतु जाणीवपूर्वक हा रस्ता केला जात नसल्याने आज मनसे कडून सरण रचो आंदोलन करण्यात आले.यानंतर चे आंदोलन हे मनसे स्टाईल होईल असा इशारा दिला.यावेळी राज्य उपाध्यक्ष वर्षाताई जगदाळे, उपाध्यक्ष कुणाल उगले,सचिव सोमेश कदम,हिराबाई कांबळे,ओम परवे,प्रतिक लोळगे सह मनसैनिक उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments