बीड: बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांची बीडच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी दीपा मुधोळ यांच्याकडून पदभार स्विकारावा असे पत्र अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी काढले आहे.
शासनाने आपली बदली केली असून, आपली नियुक्ती, जिल्हाधिकारी, बीड या पदावर श्रीम. दिपा मुधोळ-मुंडे, भाप्रसे यांच्या जागी ते पद वरिष्ठ समय श्रेणीत अवनत करून केली आहे. तरी आपण आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर विभाग यांच्या सल्ल्याने अन्य अधिका-याकडे सोपवून, नवीन पदाचा कार्यभार श्रीम. मुधोळ-मुंडे, भाप्रसे यांच्याकडून त्वरीत स्वीकारावा.असे पत्र अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी काढले आहे.
0 Comments