Header Ads Widget

Responsive Advertisement

चकलांबा : वीज पडून तीन महिला ठार



 गेवराई तालुक्यातील चकलांबा परिसरात विजांचा कडकडाटासह झालेल्या जोरात पावसात वीस पडून तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. 

गेवराई तालुक्यातील चकलांबा परिसरात वीज पडल्याने  शालनबाई शेषराव नजन[ वय 65 ]  लंका हरिभाऊ नजन [ वय 40 ] विजु बाई बाळासाहेब खेडकर [ वय41 ] यांचा मृत्यू झाला आहे. या तिन्ही महिला शेतात काम करत असताना बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला होता. त्याच वेळी विजांचा मोठा आवाज होऊन, वीज सदरील महिलांच्या अंगावर पडल्याने त्यांचा जागेवरच वीज पडून मृत्यू झाला. 
 तिनी महिला चकलांबा येथील रहिवासी असून त्यांना बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केल्या असता त्यांना जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे.  यमुना माणिक खेडकर वय वर्ष 65 या गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. 

Post a Comment

0 Comments