Header Ads Widget

Responsive Advertisement

महिलांना महिन्याला मिळणार दीड हजार रूपये



मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नेमकी काय?

मुंबई : अर्थमंत्री अजित पवार विधीमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सभागृहात सादर केला. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर हा अर्थसंकल्प महत्त्वाचा आहे. या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना,मुलींचे मोफत शिक्षण, बेरोजगारांसाठी योजनांची घोषणा केली. 

अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्त्वाकांक्षी आणि व्यापक योजना मी घोषित करत आहे. महिलांचं आर्थिक स्वातंत्र्य, स्वावलंब, सर्वांगीण विकासासाठी या योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये देण्यात येतील. या योजनेसाठी दरवर्षी 46 हजार कोटींचा निधी दिला जाईल. जुलै 2024 पासून अंमलबजावणी सुरू करण्यात येईल.

 या योजना अंर्तगत  लाभार्थी महिलांना 1500 रुपये प्रति माह दिले जाण्याची शक्यता आहे. कमीतकमी 3.50 कोटी महिलांना फायदा होण्याची आशा आहे. अर्थमंत्री अजित पवारांनी आज राज्याचा उर्वरित अर्थसंकल्प सादर केला. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात ठेवून अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर करताना अजित पवारांनी अनेक महत्त्वाच्या योजनांची घोषणा केली. 

राज्यातील शिंदे सरकार लवकरच ’मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना लागू करण्याची शक्यता आहे. राज्यातील तरुण आणि महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा निर्णय घेतला जाऊ शकतो. अलिकडेच राज्य सरकारनं शासकीय अधिकार्‍यांचं एक पथक मध्य प्रदेशला पाठवलं होतं. या पथकाद्वारे मध्य प्रदेशमधील ’मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचा अभ्यास करण्यात आला. ही योजना कशी राबवली जाते? त्यासाठी नेमके प्रारूप काय आहे? यासाठी काय-काय तरतूदी काय असतील? याचा या पथकानं अभ्यास केला.


Post a Comment

0 Comments