Header Ads Widget

Responsive Advertisement

धारूरमध्ये विजेचा शॉक लागून शेतकर्‍यासह बैलजोडीचा मृत्यू



किल्लेधारुर : सध्या शेत मशीगतीचे दिवस असल्याने नित्यनियमाप्रमाणे ढापकर कुटूंब हे आपली बैलजोडी घेऊन शेतात कोळपण करत असताना विद्ुत पोलला लावलेली तारेला चिटकून शेतकर्‍यासह दोन बैलांचा यामध्ये मृत्यू झाला. यामुळे ऐन मशागतीच्या दिवसातच शेतकर्‍यावर संकट कोसळले असल्याने सदरील शेतकर्‍याला तात्काळ मदत करावी अशी मागणी होत आहे.

तालुक्यातील संगम येथे शेतात कोळपणी करताना विद्युत पोलला दिलेल्या तानच्या तारेचा करंट लागून बैलजोडी जागीच ठार झाली तर जखमी शेतकर्‍यास उपचारासाठी दवाखान्यात हलविण्यात आले होते परंतु त्यांचाही मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारी (दि.1) दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. बालासाहेब बाबासाहेब डापकर रा.संगम (ता.धारुर) असे मयत शेतकर्‍याचे नाव असून, ते आज सोमवारी स्वत...च्या शेतात कोळपणी करत होते. यावेळी शेतातून गेलेल्या विद्युत पोलला तान दिलेल्या तारेत विद्युत प्रवाह उतरलेला होता. त्या तारेला कोळप्याचा स्पर्श होताचा करंट लागून कोळप्याला जुंपलेली 1 लाख किंमतीची बैलजोडी जागीच दगावली तर शेतकरी बालासाहेब डापकर यांना करंट लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. शेजार्‍यांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांना तातडीने उपचारासाठी माजलगाव येथे दवाखान्यात नेण्यात आले. पण त्यांचाही मृत्यू झाला आहे. या घटनेने धारुर तालुक्यात हळहळ व्ये केली जात आहे.

Post a Comment

0 Comments