केज फुकट कोंबडी का देत नाहीस ? आणि आम्ही कोंबडीचे पैसे देणार नाही. असे म्हणून दोघांनी कोंबडीच्या मालकाला लोखंडी गज डोक्यात मारून जखमी केले. ही घटना ३० जूनरोजी केज तालुक्यातील गप्पेवाडी येथे घडली.
दत्ता केदार आणि पांडु भगवान केदार हे दोघे सत्यप्रेम केदार यांच्या पोल्ट्री फॉर्मवर गेले. त्या दोघांनी सत्यप्रेम केदार यांच्याकडून तीन किलो ग्रॅम वजनाची कोंबडी विकत घेतली. त्या नंतर सत्यप्रेम केदार यांनी कोंबडीचे ४५० रूपये त्यांच्याकडे मागितले असता त्या दोघांनी पैसे देण्यास नकार दिला. आम्ही तुला पैसे देणार नाही. असे म्हणून फुकट कोंबडी घेवून जावू लागले. तेव्हा सत्यप्रेम केदार त्यांना म्हणाला की, मला या कोंबड्यांना खाद्य खावू घालण्यासाठी खर्च येतो. म्हणून तुम्ही फुकट कोंबडी नेवू नका. असे म्हणताच दत्ता केदार याने तिथे पडलेला लोखंडी गज सत्यप्रेम केदार यांच्या डोक्यात मारुन त्यांना जखमी केले. तर पांडू केदार याने त्यांचे गचुरे धरून लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी सत्यप्रेम केदार यांनी सोमवारी (दि. १) केज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून दत्ता केदार आणि पांडू केदार यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास केज पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार राजू वंजारे करीत आहेत.

0 Comments